Breaking News

काँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

उरण : प्रतिनिधी

गोवठणे, आवरे आणि सुरुंगपाडा गावांतील काँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी दि. 02 भाजपत प्रवेश केला. या वेळी जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, भाजप उरण उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शहराध्यक्ष कौशिक शाह, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील,  शहर युवा अध्यक्ष नीलेश पाटील, माजी नगरसेवक राजेश कोळी, गोठवणेचे वर्तक सर, आदींच्या उपस्थितीत उरण नगरपालिकेत पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.

भाजप कार्यकर्ते संतोष वर्तक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, या चार महिन्यांतील गोवठणे गावातील हा तिसरा पक्षप्रवेश असून गोवठणे ग्रामपंचायतीवर नक्कीच भाजपचा झेंडा फडकणार, अशी त्यांनी ग्वाही दिली, तसेच महेश बालदी, रविशेठ भोईर यांनीही मार्गदर्शन केले.

या वेळी गोवठणे गावातील शाखा अध्यक्ष रोशन म्हात्रे, मंगेश म्हात्रे, महेश म्हात्रे, तेजस म्हात्रे, मनीष म्हात्रे, प्रशांत वर्तक, सूरज म्हात्रे, महिला तालुका पदाधिकारी राणी म्हात्रे, उपसरपंच विक्रांत वर्तक, प्रवीण पाटील, संतोष वर्तक, प्रेम पाटील, अतिश वर्तक, उमेश वर्तक, मनोज पाटील, सुरेंद्र पाटील, किशोर वर्तक, संदेश म्हात्रे, किरण म्हात्रे, निर्णय पाटील, किरण पाटील, हर्षल म्हात्रे, प्रितम वर्तक, अनिल म्हात्रे, सुरेश वर्तक, जयदास वर्तक, राजश्री वर्तक, करुणा वर्तक, महेंद्र म्हात्रे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आवरे येथील जयदीप ठाकूर, अनिता ठाकूर, मधुकर गावडे, गुरूनाथ गावडे, महादेव ऋणी, आमर गावंड व अश्विन गावंड आदी काँग्रेस व शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

सुरूंगपाडा येथील काँग्रेस व शेकापचे जॉकेश तांडेल, श्रीराम तांडेल, नकुल पाटील, दशरथ मते,   महेश तांडेल, आकाश पाटील, सुरज पाटील, ओमकार तांडेल, धर्मा काशिनाथ तांडेल, ज्ञानदेव पाटील, नामदेव तांडेल, धीरज पाटील, विश्वनाथ पाटील, मयूर पाटील, अंकुश पाटील आदींनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात भाजपची ताकद वाढू लागली आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply