Breaking News

पाताळगंगेने धोक्याची पातळी ओलांडली

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पाणी

खालापूर : प्रतिनिधी

खोपोली, खालापूर, रसायनी परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाचे घुमशान सुरू आहे. खालापूर तालुक्याची वरदायिनी असणारी पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

खोपोलीत बीएसएनएल कार्यालयालगत उभारण्यात येत असलेल्या महाकाय गृहसंकुल परिसरात केलेला मातीचा भराव व बांधकामामुळे पावसाचे पाणी अडल्याने हे पाणी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर येत असून, त्यामुळे महामार्गाचा सुमारे एक किमी लांबीचा भाग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे येथील वाहतूक रोखण्यात आली होती. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनूप दुरे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पहाणी केली. आणि कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांच्या सहकार्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने येथे तुंबलेल्या पाण्याला मोकळी वाट करून दिली. त्यानंतर  महामार्गावरील पाणी कमी झाले व मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply