लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक
कामोठे ः रामप्रहर वृत्त
नेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. या अनुषंगाने जयेंद्र जोशी आणि रवींद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे आयोजित समाजोपयोगी वस्तूंच्या वाटप कार्यक्रमात व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देण्याऐवजी किंवा बॅनर लावण्याऐवजी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जयेंद्रशेठ जोशी युवा मंच आणि रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२) कामोठे सेक्टर ३६ येथील मसाला मंत्रा हॉल येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत वस्तूंचे वाटप करून उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, नगरसेवक रवी जोशी, हॅप्पी सिंग, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, प्रदीप भगत, नगरसेविका शीला भगत, हेमलता गोवारी, आयोजक जयेंद्र जोशी, राजेश गायकर, हर्षवर्धन पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना मधुमेह तपासणी किट, ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन आधारासाठी वॉकिंग स्टीक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. परिसरातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे अनेक गरजू नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
RamPrahar – The Panvel Daily Paper