Breaking News

माथेरान जुम्मापट्टीजवळ वटवृक्ष कोसळला

कर्जत : प्रतिनिधी

माथेरान-नेरळ घाटरस्त्यावर सायंकाळी  साडेचार वाजण्याच्या सुमारास सुमारे शंभर वर्षापूर्वीचे मोठे वडाचे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.

माथेरानमध्ये गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाटातील धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसत आहेत. धबधब्याच्या आकर्षणामुळे माथेरानमध्ये पर्यटक येत असल्याने नेरळ-माथेरान घाटात वाहतूक वाढली आहे. शनिवार-रविवार असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घाटात वाहतूक सुरू असतांना जुम्मापट्टीजवळ वडाचा मोठा वृक्ष मुळापासून उमळून रस्त्यावर पडला. त्यावेळेस कुठलेही वाहन येत-जात नसल्याने सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. टपरी वजा हॉटेलसमोर वटवृक्ष पडला. परंतु हॉटेलचे कुठल्याही प्रकारचे नुकसान न झाल्याने हॉटेल चालकाने सुटकेचा निश्वास सोडला.

वृक्ष पडल्याचे समजाच समोरील गावातील आदिवासी बांधव तसेच टॅक्सी चालक मदतीला धावून गेले.  छोटा रस्ता बनवून एकेरी वाहतूक चालू केली. जेसीबीच्या सहाय्याने वृक्ष बाजूला केल्यानंतर तब्बल दोन तासानी या घाटरस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply