Breaking News

एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू उदया मुंबईत

मुंबई : प्रतिनिधी
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी (दि. 14) मुंबईत येत आहेत. भाजप नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अपक्ष आमदार आणि खासदारांना मूर्मू यांच्यासह होणार्‍या बैठक व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
द्रौपदी मुर्मू या गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास मुंबईत येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारती पवार आणि अन्य नेते त्यांच्या समवेत असतील. भाजप, शिंदे गट व अपक्ष आमदार-खासदारांबरोबर मुर्मू यांची बैठक विमानतळाजवळील लीला हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आपल्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन मुर्मू या बैठकीत करणार आहेत.

Check Also

पनवेलमध्ये नारीशक्ती वंदन अधिनियम समर्थनार्थ भव्य पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी टप्पा मानल्या जाणाऱ्या नारीशक्ती वंदन अधिनियम या …

Leave a Reply