Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कौशल्य विकास कक्ष व वोकस्कील संस्था यांच्या संयुक्त विद्ममाने गुरूवारी (दि. 14) कौशल्य विकास व गिग अर्थव्यवस्थेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आवडीच्या कार्यक्षेत्रामध्ये अत्यावश्यक वाटणार्‍या सर्व कौशल्याची यादी प्रस्तुत केली. भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्यांचा सहभाग कोणत्या स्तरावर आहे. याचे डेमोग्राफिक डिव्डिडेंटद्वारे महत्त्व पटवून दिले.

प्रस्तुत कार्यक्रमास वोकस्कील संस्थेच्या अध्यक्ष डॉ. आरती अग्रवाल व रिजवाना कदमतोडे या प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. तसेच या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सफिना मुकादम यांनी केले.तसेच कौशल्य विकास कक्षच्या अध्यक्ष रूपाली नागरेकर यांनी उपस्थिताचे आभार मानले.

कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. सिदेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply