Breaking News

गुजरातमधील मनपा निवडणुकीत भाजपचा विजयी षटकार

अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरातमध्ये झालेल्या सहा मोठ्या शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. भाजपने अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सहापैकी सहा महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली.
अहमदाबादमध्ये 192 पैकी हाती आलेल्या कलांमध्ये भाजपने 116 जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला केवळ 21 जागांवर आघाडी मिळाली, तर चार जागा एमआयएमच्या पारड्यात गेल्या. जामनगरमध्ये भाजपने 64 पैकी 50 जागांवर बाजी मारली. काँग्रेसला 11 आणि इतर पक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत.
मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे शहर राजकोटमध्येही भाजपने जोरदार मुसंडी मारली. येथील 72 पैकी 68 जागांवर भाजपनेे बाजी मारली, तर काँग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या. येथे भाजपने मागील निवडणुकीच्या तुलनेत 30 जागा जिंकल्या आहेत. सूरतमध्ये 120 जागांपैकी भाजपने 93, तर आपने 27 जागी विजय मिळविला.
बडोदा महानगरपालिकेच्या 76 पैकी 53 जागांवर भाजपाने आघाडी घेतली, तर काँग्रेसच्या खात्यात केवळ 7 जागाच जाताना दिसत आहेत. भावनगरमध्ये 52 पैकी भाजपने 44, तर काँग्रेसने आठ जागांवर विजय प्राप्त केला आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply