Breaking News

रायगड जि.प.चे 133 पूल धोकादायक

दुरुस्तीसाठी हवेत 98 कोटी रुपये

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेले 133 पूल धोकादायक झाले आहेत. या पुलांच्या दुरुस्तीसाठी 98 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 133 पूल धोकादायक आहेत. तर स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात आलेल्या पुलांची संख्या एकूण 35 आहे. तर 97 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे अद्याप बाकी आहे. ऑडिट अहवालाच्या शिफारशीनुसार अद्यापपर्यंत केवळ एकाच पुलाची दुरूस्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पुलांच्या दुरुस्ती करण्यासाठी तब्बल 98 कोटी 50 लाख एवढ्या निधीची आवश्यकता असणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परीषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. वाय. बारदेसकर यांनी दिली. रायगड जिल्हा परिषद आपल्या उत्पन्नातील सर्वाधिक खर्च हा बांधकाम विभागावर करत असते. परंतु त्यातून पुलांच्या दुरूस्तीवर खर्च केला जात नाही, असं या आकडेवारीवरून दिसून येते. मग हा खर्च होतो कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पुलांच्या दुरूस्तीबरोबरच पुनर्निमाणाचीदेखील गरज आहे. या कामाकरिता जिल्हा परीषदेकडे पुरेसा निधी नाही. त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेतली जातील.

-के. वाय. बारदेसकर, कार्यकारी अभियंता, राजिप बांधकाम विभाग

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply