कर्जत : बातमीदार
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शुक्रवारी कर्जतमधील आमराई परिसरात असलेल्या क्रांती स्तंभाला नगर परिषदेच्या वतीने, तर नेरळच्या माथेरान नाक्यावर या असलेल्या हुतात्मा चौकात ग्रामपंचायत आणि आदिवासी संघटनांच्या वतीने अभिवादन
करण्यात आले.
कर्जत नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी आमराई परिसरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार घालून अभिवादन केले. या वेळी नगरसेवक उपस्थित होते, तर नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात आले. या वेळी सरपंच जान्हवी साळुंखे, उपसरपंच अंकुश शेळके, ग्रामपंचायत सदस्य राजेश मिरकुटे, माजी सदस्य जयवंत साळुंखे आदी उपस्थित होते. या ठिकाणी आदिवासी समाजाने काढलेल्या बाईक रॅलीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन केले. आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद, बाळकृष्ण पादिर यांनी हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्यांना अभिवादन केले.