Breaking News

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सुभाष पुजारींनी जिंकले सुवर्णपदक

पनवेल : वार्ताहर
54व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत पळस्पे महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे पोलीस दलासह पनवेलकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
मालदीव येथे आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत 80 किलो वजनी गटात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या यशाने महाराष्ट्र पोलीस दलाचे व भारत देशांचे नाव उंचावले आहे. याबद्दल पुजारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
भारताचा 81 सदस्यीय जम्बो संघ या स्पर्धेसाठी मालदीवमध्ये दाखल झाला आहे, तर आशियातील 24 देशांमधून शेकडो खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या नऊ सदस्यीय संघाला व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांचे आशीर्वाद लाभले आहेत. यशस्वी व्हा, अशा शब्दांत तळवलकरांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंना शुभाशीर्वाद दिले आहेत. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटेही सोबत आहेत. त्यामुळे आणखी काही
पदकांची अपेक्षा आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply