पनवेल ः प्रतिनिधी
वारदोली गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बुधवारी (दि. 8) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या शिल्पा पवार यांनी शेकापच्या नीता पाटील यांचा पराभव करीत वारदोली गु्रप ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. त्यानिमित्त पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच शिल्पा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील
वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, वारदोली गु्रप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच लता पाटील, उपसरपंच संगीता भूतांबरा, सदस्य जगदीश केंगे, सुवर्णा पाटील, सतीश पाटील, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, युवा नेते योगेश लहाने, राहुल घरत, माजी सरपंच संजय गायकर, माजी सदस्य अरुण पवार, नामदेव भूतांबरा, अनंता पवार, जगन पवार, पुंडलिक पवार, जगदीश पाटील, विलास पाटील, रामदास ढोपरे, गोपाळ पाटील, बच्चू पवार, विष्णू पवार, हेमंत पवार, रामदास पवार, शंकर पवार, संतोष पाटील, लक्ष्मण मेढेकर, सोपान चोरघे, कानू पवार, रमेश पवार, वसंत चोरघे, काशिनाथ पाटील, अशोक पाटील (बोर्ले), संतोष शेळके (पाली), दत्ता गायकर, संतोष गायकर, बबन चोरघे, सुरेश पवार, जितेंद्र बताले (वारदोली), राम भवर, पांडुरंग वारगडे, सोपान बताले, धनाजी चोरघे, प्रवीण चोरघे, विशाल पवार, अनिल पवार, प्रशांत पाटील, रंजना पवार, करूणा पाटील, वैशाली पवार, राजेश्री पवार, अलका पाटील, सानिका पवार, लक्ष्मण घरत, सुचिता पवार, अस्मिता पवार, गुना पवार, मैना पाटील, रेखा गावकर, बेबी गडकरी यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.