Breaking News

अलिबाग-पेण, मुंबईत अनुभवा शून्य सावली

पेण ः प्रतिनिधीपृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिण, तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो, पण या दोन टोकांच्या वृत्तांमधील लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. 14 मे अलिबाग-पेण, तर 15 मे रोजी मुंबईत या शून्य सावलीचा रोमांचकारी अनुभव सर्व नागरिकांना अनुभवता येईल.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply