पुणे ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक गुरुवारी (दि. 9) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे़. यादरम्यान सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किमी़ 85/100 या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत़. हलकी चारचाकी व इतर वाहने किवळे पुलावरून जुन्या मुंबई -पुणे महामार्गाने मुंबईकडे वळवण्यात येणार आहे़त. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमी 55/600 आणि 88वर (मुंबई वाहिनी) हे काम करण्यात येणार आहे़. वाहनचालकांना द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीची सद्यस्थिती समजावी यासाठी फलक लावण्यात येत आहेत़. वाहनचालकांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांनी केले आहे़.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …