अलिबाग : प्रतिनिधी
प्रबोधनाबरोबरच समाजसेवा करणार्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीकरिता ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते सात लाखांचा धनादेश बुधवारी (दि. 20) रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
रेवदंडा येथे झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले की, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडूपन रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीकरिता सात लाख रुपयांचा धनादेश प्राप्त झाला आहे. या रकमेचा विनीयोग जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी केला जाईल. रायगड जिल्हा पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबीयांतर्फे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे मनःपूर्वक आभार!
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper