कर्जत : बातमीदार
भारतीय जनता पक्षाच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारचा नारा दिला. मोदी यांचे लाईव्ह भाषण कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 28) शिरसे येथील राधामाई मंगल कार्यालयात ऐकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘संघटन संवाद‘ च्या माध्यमातून पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने गुरुवारी सकाळपासूनच कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साह होता. पंतप्रधान मोदी दुपारी साडेबारा वाजता थेट संवाद साधणार असल्याने त्यांचे विचार ऐकण्यासाठी कर्जत तालुका भाजपच्या वतीने लाईव्ह भाषण कार्यकर्त्यांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांचा संघटन संवाद सुरू होण्याआधी सर्व कार्यकर्ते शिरसे येथील राधामाई मंगल कार्यालयात जमले होते. मंगल कार्यालयात दोन प्रोजेक्टर लावण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका मंडल अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, जिल्हा उपाध्यक्ष मृणाल खेडकर, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्यासह नगरसेवक, अन्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर मन की बात करीत, भाजप कार्यकर्त्यांनी विचलित न होता आपल्या सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य मतदारांपर्यन्त पोहचविण्याचे आवाहन केले.