परेश ठाकूर यांच्या हस्त प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांच्यावतीने हातमाग व यंत्रमाग कापड विक्री व प्रदर्शन पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये भरवण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले.
पनवेल महापालिकेच्या कार्यालयासमोरील गोखले हॉलमध्ये भारवण्यात आलेल्या प्रदर्शन हे 1 ते 16 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी या वेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, नीता माळी, निता मंजुळे, प्रसाद म्हात्रे, संदीप पाटील, प्रितम म्हात्रे, श्वेता म्हात्रे, गोवर्धन कोडम, योगेश पोलन, दीपक गुंडू, बाळू कोडम, श्रीनिवास दुरसा, मधुकर सुरम, लक्ष्मण उडता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रदर्शनाचे प्रमुख पांडुरंग पोलन यांनी या हातमागा विणकाम करून तयार केलेले कपडे हे चांगल्या दर्जाचे असतात त्यामुळे या प्रदर्शनाचा पनवेलकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper