पनवेलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

शारदा संगीत क्लासेस यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव 2022 हा कार्यक्रम श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शारदा संगीत क्लासेसच्या सर्व शिष्यगणांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवर्य पंडित बाबादासजी तुपे आणि गुरुवर्य पंडित विष्णूबुवा सोळंके यांच्या पाद्यपूजनाचा सोहळा झाला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली.

पनवेल मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शारदा संगित क्लासेसच्यावतीने ‘गुरुपौर्णिमा उत्सव 2022’ चे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात गुरुवार्य हरिदासजी महाले आणि गुरुवर्य पंडीत विष्णूबुवा सोळुंके गुरुजी यांचे सुश्राव्य गायन सादर करण्यात आले.

या वेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा वर्षा नाईक, पूनम ठाकूर, चंद्रप्रभा घरत, यांच्यासह शारदा संगीत क्लासेसचे सर्व शिष्यगण आणि रसिक उपस्थित होते. या कार्यक्रमात बाबादास तुपे गुरुजी, विष्णू बुवा सोळंकी गुरुजी, वैभव मंडलिक, ओम बोगांने, विनोद तोडेकर, सुप्रसिद्ध तबला वादक पंडित किशोरजी पांडे, वैभव कडू, पावन राजे, संतोष खरे, कुमार कौस्तुभ भाग्यवंत, किरण भोईर, ओवेष कदम, मंगेश साळुंखे, यांनी आपली कला सादर केली.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply