Breaking News

लोकनेते ‘दिबां’ना सांस्कृतिक आदरांजली

कामोठे : रामप्रहर वृत्त

एकविरा कला संस्थेच्याबतीने प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांना सांस्कृतिक आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम कामोठे येथील आगरी समाज मंगल कार्यालयात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते दि. बा. पाटील यांना आजदरांजली वाहण्याकरीता एकविरा कला संस्थेचे तेजस पाटील यांच्या माध्यामतून कामोठे येथील आगरी समाज कार्यालयात माऊली मित्र मंडळ आणि रिक्षा चालक मालक संघटनेच्या सहकार्याने सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जे. डी तांडेल, पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, चारुशीला घरत, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती कुसुम म्हात्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकवाड, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, युवा नेते हॅप्पी सिंग, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, शंकर म्हात्रे आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेजस पाटील हे कलेच्या माध्यामतून समाजसेवेचे काम करत असल्याचे प्रतिपादन करून ह्या सांस्कृतीक कार्यक्रमातून लोकनेते दि. बा. पाटील यांना आदराजंली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply