नेरूळ विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत सेक्टर 23 जुईनगर येथील जागृती को. ऑप. हौ. सोसायटी, याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या बांधकामावर मनपातर्फे निष्कसनाची कारवाई करण्यात आली.

या अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालय, नेरूळ यांचेमार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. या अनधिकृत बांधकामावर नेरूळ विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिका 10 मजूर,  एक पीकअप व्हॅन, तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Check Also

Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen

Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …

Leave a Reply