पनवेल : प्रतिनिधी
कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना पैसे परत करायचे नाहीत म्हणून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील अद्यापही एटीएसच्या, म. स. सं. अधिनियम 1960चे कलम 88 अन्वये चौकशी करणार्या अधिकार्यांपुढे व इतर प्राधीकरणाच्या अधिकार्यांसमोर लेखी जवाब नोंदवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवेक पाटील तेवढी तरी कृतज्ञता दाखवतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 512 कोटी 54 लाख 53 हजार रुपयांचा गैरव्यवहार करून बँक बुडविणारे शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी
चौकशी अधिकार्यांसमोर कर्ज मीच घेतले आहे, त्याला कुठलाही संचालक, कर्जदार जबाबदार नाही असे लिहून दिले आहे, मात्र त्याची पुढची कार्यवाही म्हणून एटीएस, म. स. सं. अधिनियम 1960चे कलम 88 अन्वये चौकशी करणार्या अधिकार्यांकडे तसा जबाब नोंदविणे क्रमप्राप्त होते. विवेक पाटील यांनी ज्याप्रमाणे चौकशी अधिकार्यांकडे लिहून दिले तो जबाब एटीएस, म. स. सं. अधिनियम 1960चे कलम 88अन्वये चौकशी करणार्या अधिकार्यांना दिला तर ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे व मेहनतीचे पैसे मिळतील, पण त्यासाठी विवेक पाटील तेवढी तरी कृतज्ञता दाखवतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
कर्नाळा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) आहे, पण विवेक पाटील यांना हजारो खातेदार व ठेवीदारांचे पैसे द्यायचे नसल्यानेच या तपासात विवेक पाटील स्वतःहून सहकार्य करीत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …