मध्यरात्रीच्या ध्वजारोहणास कर्जतकरांचा उदंड प्रतिसाद
कर्जत : प्रतिनिधी
तालुका मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. कर्जतमधील मध्यरात्रीच्या धवजारोहणाचे हे आठरावे वर्ष आहे. कर्जतच्या स्वर्गीय भाऊसाहेब राऊत चौकात 14 ऑगष्ट रोजी मध्यरात्री ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत प्रेस क्लबचे ज्ञानेश्वर बागडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चौकाच्या नामफलकाला जे. एम. मिर्झा यांनी पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. त्यांनतर मध्यरात्री बारा वाजून दोन मिनिटांनी कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चौकाचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. नितीन आरेकर यांनी केले. माजी नगराध्यक्ष राजेश लाड, रजनी गायकवाड, राहुल डाळिंबकर, विवेक दांडेकर, सोमनाथ ठोंबरे, बळवंत घुमरे, संकेत भासे, नगरसेविका मधुरा चंदन, विशाखा जिनगरे, संचिता पाटील, प्राची डेरवणकर, स्वामीनी मांजरे, हेमंत ठाणगे, संतोष पाटील, बिनीता घुमरे, विजय हरिश्चंद्रे, राजाभाऊ कोठारी, दिलीप गडकरी, पांडुरंग गरवारे, राहुल तिटकारे, अॅड. राजेंद्र निगुडकर, विकास चित्ते, मुफद्दल डाभिया, विनायक उपाध्ये, भगवान शिंदे, प्रभाकर गंगावणे, अरुण निघोजकर, ज्ञानेश्वर वाडीले, असीफ मिर्झा, अमीर मणियार, अभिजीत रेणोसे, कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय मांडे, संजय गायकवाड, वैदेही पुरोहित आदिंसह देशप्रेमी नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी (दि. 15) नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम, उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, पोलीस ठाण्यात निरीक्षक के. डी. कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, दिवाणी न्यायालयात महिला न्यायाधीश एस. आर. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महिला न्यायाधीश टी. एस. आपटे उपस्थित होत्या. कोंकण ज्ञानपीठ महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य रवींद्र कटके, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान संस्थेत अध्यक्ष मुकेश सुर्वे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, माजी नगराध्यक्ष शरद लाड, पुष्पा दगडे, मोहन ठोसर आदींसह नागरिक उपस्थित होते.
नेरळ येथे मध्यरात्री ध्वजारोहण
कर्जत : नेरळ येथील हुतात्मा चौकात रविवारी मध्यरात्री भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ नंदकुमार तासगावकर यांनी हुतात्मा चौकात मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी ध्वजारोहण केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने मध्यरात्रीच्या ध्वजारोहणापुर्वी विश्वजीत नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळमध्ये मशाल फेरी काढण्यात आली होती. त्यानंतर मध्यरात्री डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या हस्ते झेंडा फडकाविण्यात आला. सामुदायिक राष्ट्रगीत तसेच झेंडा गीत झाले. स्मारक समितीच्या वतीने दहावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या यादनिका शिवगण, भावेश म्हसे आणि तन्वी देशमुख यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. नेरळच्या सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, धर्मानंद गायकवाड, सुप्रिया भगत, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, माजी उपसरपंच अंकुश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे तसेच संजय गवळी, राजेश भगत, अंकुश दाभणे, डॉ हेमंत शेवाळे, अॅड. अल्ताफ डोंगरे, अॅड. रमाकांत तरे, ऋषिकेश कांबळे, प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे, मुख्याध्यापिका विनया काकडे यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य, विद्यार्थी, महिला आणि नागरिक या वेळी उपस्थित होते.
रोहा तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहणाने मानवंदना
रोहे : स्वातंत्र्य दिनानिमित्त रोहा तालुक्यातील शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, महाविद्यालयात सोमवारी (दि. 15) सकाळी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. रोहा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तहसीलदार कविता जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आमदार अनिकेत तटकरे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समिर शेडगे, यशवंत शिंदे, लालताशेठ कुशवाह, नायब तहसीलदार मानसी साठे, राजेश थोरे, महेश कोलाटकर, अनिता शेडगे,उपसरपंच उत्तम नाईक, नवनीत डोलकर, निवृत्त नायब तहसीलदार शरद पोकळे, सुरेश पाटील, नारायण पाटील, दीपक साळवी यांच्यासह महसुल कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. रोहा पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यालयीन अधीक्षक दिनेश वारगे, विस्तार अधिकारी महारुद्र फडतरे, विस्तार अधिकारी सुनील गायकवाड, कृषी अधिकारी मिलींद कुंभारे, अशोक दांडेकर, कर्मचारी उपस्थित होते. नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समिर शेडगे, महेंद्र गुजर, महेश कोलाटकर, राजेंद्र जैन, शिल्पा धोत्रे, जुबेर चोगले, सारिका पायगुडे, अमित उकडे, निवास पाटील, मयुर दिवेकर, यशवंत शिंदे, अप्पा शेडगे, उस्मान रोहेकर, निलेश शिर्के, चंद्रकांत पार्टे, रवी चाळके, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस ठाण्याच्या प्रांगणात निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेत ध्वजारोहण
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि. 15) भारताचा स्वातंत्र्य महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी देशभक्तीपर गीतांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, माध्यमिक शिक्षण विभाग अधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव, मुख्य लेखा, वित्त अधिकारी भगवान घाडगे, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता के. वाय. बारदेस्कर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता सुधीर वेंगुर्लेकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. यावेळी तंबाखू मुक्ती आणि पर्यावरण जतन करण्याबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली.
रेस्क्यू टीमकडून मानवंदना
माणगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त येथील साळुंखे रेस्क्यू टीमच्या जवानांनी जुने माणगाव येथील काळ नदीत सोमवारी (दि. 15) बोटींमधून रॅली काढली होती. जुने माणगावमधील हॉटेल मयूरजवळील पाणवठा येथून काळ नदीत रॅलीला सुरूवात झाली. माणगावात प्रथमच बोटींमधून रॅली काढण्यात आली होती. या वेळी साळुंखे रेस्क्यू टीमचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी आपल्या रेस्क्यू टीमबद्दल उपस्थित नागरिकांना माहिती दिली. माणगावचे उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरसेवक कपिल गायकवाड, दिनेश रातवडकर, प्रशांत साबळे, हेमंत चंद्रकांत शेट, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, आर. डी. साळवी, पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. सुरवसे, संतोष सुगरे, स्वप्नाली शिंदे, बाळा मांजरे, सुमित काळे, संजय मालोरे, सचिन गोरेगावकर तसेच रेस्क्यू पथकाचे जवान सरफराज अफ़वारे, इमरान धवलालकर, शादाब गैबी, रवींद्र भिकू मोरे, इरफान हाजीते, रफिक जामदार, फहीम वाडेकर, अमित,सागर, श्वेता पाटील, धनश्री उभारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
रेवदंड्यात मोटरसायकल, तिरंगा रॅली
रेवदंडा : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सोमवारी (दि. 15) सकाळी रेवदंड्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर रेवदंडा मित्रमंडळाच्या वतीने मोटरसायकल व तिरंगा रॅली काढण्यात आली. रेवदंडा ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, प्राथमिक शाळा, हायस्कुल, अर्बन बँक, आगरकोट किल्ला आदी ठिकाणी सोमवारी सकाळी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर अकरा वाजता रेवदंडा मित्रमंडळाच्या वतीने रेवदंडा मोठे बंदर ते चौल अशी मोटरसायकल आणि तिरंगा रॅली काढण्यात आली होती. पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक थोरात यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि रेवदंड्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम् आदी घोषणांनी रेवदंडा ते चौल बाजारपेठेतील रस्ता दणाणला. ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुर्तफा उभे राहून या मोटरसायकल रॅलीचे स्वागत केले. तर ठिकठिकाणी घराच्या गॅलरीतून तिरंगा रॅलीवर फुलाचा वर्षाव करण्या आला. रेवदंडा पारनाका येेथे राष्ट्रगीताचे गायन होऊन तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली.ही मोटरसायकल व तिरंगा रॅली यशस्वी करण्यसाठी रेवदंडा मित्रमंडळाचे अमित म्हात्रे, निलेश खोत, योगेश पिटनाईक, संदिप खोत, संतोष मोरे, राजू चुनेकर, आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

RamPrahar – The Panvel Daily Paper