पनवेल ः मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी रविवारी शिवाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, पं. स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीेचे उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, शिवाजीनगर उपाध्यक्ष व्ही. के. ठाकूर, सुधीर ठाकूर, गजानन ठाकूर, धनंजय ठाकूर, पी. के. ठाकूर, आशिष घरत, पंढरीनाथ ठाकूर, शनिदास ठाकूर, श्रीधर ठाकूर, कुसुम ठाकूर, शोभा ठाकूर, वंदना ठाकूर, रेणुका ठाकूर, लता ठाकूर, नंदा ठाकूर, आदेश ठाकूर, आदित्य ठाकूर, अपूर्व ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …