लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघर युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली, तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले.
खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये खारघर युवा प्रेरणा सामाजिक संस्था, महेश्वरी प्रगती मंडळ खारघर, टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासोबतच सनपाडा येथील साई दृष्टी सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटलच्या सहयोगाने मोफत नेत्ररोग चिकिस्ता शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले, तसेच आयोजकांचे कौतुक केले.
या वेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका नेत्रा पाटील, युवा प्रेरणा संस्थेचे संस्थापक किरण पाटील, भाजपचे खारघर तळोजा उपाध्यक्ष दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, महेश्वरी सामाजिक संस्थेचे सोमन मालानी, राकेश सोमानी, आशिष मणियार, जय डागा, सतीश मुंदडा, आशिष सारडा, मंगेश चिकची, युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे कुणाल देवकर, रितेश लववत, ललित बडोदेकर, मंजू चोप्रा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरात 81 जणांनी रक्तदान केले तसेच सुमारे 100 जणांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.