Breaking News

यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आवश्यक -डॉ. कोकाटे मकबूल

मुरूडमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान

मुरूड : प्रतिनिधी

आपले आयुष्य सफल व यशस्वी बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व शिस्त बाळगणे खूप आवश्यक आहे. वेळेचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबूल कोकाटे यांनी मुरूड येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुरूड तहसील कार्यालयाने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्त्व, चित्रकला आदि विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात सुमारे तीन हजार दोनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धांचा पारितोषीक वितरण समारंभ शहरातील माळी समाज सभागृहात झाला. त्यावेळी डॉ. कोकाटे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने देश प्रेम बाळगणे खूप आवश्यक आहे. सकारात्मक विचार करा, म्हणजे कोणतेही कठीण काम सोपे होईल, असा सल्ला कोस्टगार्डचे कमांडिंग ऑफिसर ए. व्ही. मुसळे यांनी या वेळी दिला. नायब तहसीलदार अमित पुरी यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात स्पर्धेतील  यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे, गटविकास अधिकारी सुभाष वाणी, माजी नगरसेवक विश्वास चव्हाण, नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, कोस्टगार्डचे कमांडिंग ऑफिसर अरुणकुमार सिंग, विजय टाटा यांच्यासह विद्यार्थी व पालक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply