Breaking News

उमरोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या अलका तांडेल बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील उमरोली गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी (दि. 13) झाली. या निवडणूकीत भाजपच्या अलका प्रकाश तांडेल यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संयज पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच अलका तांडेल यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, माजी सरपंच शांताराम पोपेटा, नितीन काठावले, नारायण मढवी, नायारण माळी, उपसरपंच रोशन पोपेटा, सदस्य प्रितेश गांगरकर, शुभांगी मढवी, रेश्मा पाटील, कमला मढवी, श्वेता माळी, बेबी ठाकूर, रिकण गांगरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply