Breaking News

अर्थसाक्षर स्पर्धा : 33

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

  1. टाटा उद्योग समूहातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे नाव काय आहे?

अ. टाटा एलेक्सी  आ. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) इ. टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड ई. टाटा सन्स लिमिटेड

  1. पुढीलपैकी कोणती एक बँक सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी आहे?

अ. एक्सिस बँक   आ. आयडीबीआय बँक इ. बंधन बँक ई. इंडिया ओव्हरसीज बँक

  1. शेअर बाजाराच्या निफ्टी इंडेक्समध्ये किती कंपन्यांचा समावेश आहे?

अ. 10 आ. 30 इ. 50 ई. 100

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply