Breaking News

माणगावात दहीहंडी उत्सव उत्साहात

गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात; सहा-सात थरांपर्यंत सलामी

माणगाव : प्रतिनिधी

आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळ आयोजित माणगावात तालुका शिवसेने (शिंदे गट) चा दहीहंडी उत्सव शुक्रवारी (दि.19) पंचायत समिती कार्यालय परिसरात उत्साहात साजरा झाला. या दहीहंडी उत्सवात रायगड जिल्ह्यातील अनेक गोविंद पथकांनी भाग घेऊन लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली.

आमदार भरत गोगावले, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी उत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथके व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या दहीहंडी उत्सवात चार थरापासून पुढे सलामी देणार्‍या गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात करण्यात आली. माणगाव, महाड, नाते, रोहा, खोपोली, देवकान्हे, धाटाव येथील सुमारे 25 गोविंदा पथकांनी उपस्थिती दाखवून सहा ते सात थरांपर्यंत सलामी देऊन रोख रकमांची बक्षिसे पटकाविली. खांदाड येथील सोनभैरव गोविंदा पथकाने सात थरांची सलामी देऊन उपस्थितांकडून वाहवा मिळविली.

शिवसेना (शिंदे गट) नेते अ‍ॅड. राजीव साबळे, तालुकाप्रमुख अ‍ॅड. महेंद्र मानकर, शहरप्रमुख सुनील पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती शर्मिला सुर्वे यांच्यासह  पदाधिकारी, शिवसैनिक व दहीहंडी प्रेमी नागरिक या वेळी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

काला पानी @ ६८; राज खोसला आणि देव आनंद जोडीची रहस्यरंजकता…

दिग्दर्शक राज खोसला यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. जन्म ३१ मे १९२५. आणि मृत्यू ९ …

Leave a Reply