
पनवेल : कोविड काळात काम केलेल्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेणारा विशेषांक दै. मुंबई तरुण भारतकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, ’कोविड योद्धा 125’ नामक या विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर, पत्रकार सय्यद अकबर, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे आदी उपस्थित होते.