Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वाचनालय दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.23) वाचनालय समितीतर्फे वाचनालय दिन साजरा करण्यात आला. प्रस्तावना देत असताना प्रा. प्रवर शर्मा यांनी सर्व प्राध्यापकांना वाचनालयातील ग्रंथ संपदेविषयी माहिती दिली व पुस्तके वाचन करण्यासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून केले. आजच्या धावत्या जीवनामध्ये पुस्तकांचे असणारे महत्त्व समजावून सांगितले व ज्ञान संपादन करण्यासाठी पुस्तकांची असणारी गरज पटवून दिली. कार्यक्रमाचे आयोजन वाचनालय समितीचे समन्वयक प्रा. प्रवर शर्मा यांनी केले तसेच वैभव झगडे, डॉ. निलम लोहकरे, प्रा. राजश्री म्हात्रे यांनी सहकार्य केले. या वेळी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनालयाचा आस्वाद घेतला. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर  तसेच आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply