माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजप्रबोधनाचे काम करणार्या वारकर्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील 22 समाजप्रबोधनकारांचा सत्कार केला. नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या सन्मान प्रबोधनाचा या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उद्योजक जे. एम. म्हात्रे, इक्बाल काजी, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेविका सुशिला घरत, उद्योजक तुकाराम दुधे, उद्योजक राजेंद्र कोलकर, ह.भ.प. पद्माकर महाराज पाटील, ह.भ.प. धाऊशेठ धर्मा पाटील व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे व्यासपीठावर उपस्थित होते. संत तुकाराम महाराज कोकण दिंडीला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल या दिंडीचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. दिंडीच्या वतीने दिंडीचे अध्यक्ष पद्माकर महाराज पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या दिंडी बरोबरच ह.भ.प. कृष्णा महाराज पाटील, राघो कडव, संतोष सते, महादेव शेळके, प्रकाश पाटील, संजय पाटील, शुभम जाधव, श्री विठ्ठल रखुमाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धाऊशेठ धर्मा पाटील, महाराष्ट्र वारकरी महामंडळ रायगड जिल्हाध्यक्ष पुंडलिक फडके, रघुनाथ पाटील, सुरेश पाटील, बामा भोपी, लालचंद राजे, संजय पाटील, श्रीकांत रसाळ, वंदनाताई घोंगडे, राजेंद्र नामदेव पाटील, विनया विजय पाटील, सविता धाऊ पाटील, बळीराम भगत, सिताराम महाराज जळे यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, तुळस, टोपी, ज्ञानेश्वरी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी पत्रकार संजय कदम, सय्यद अकबर, किरण बाथम, शंकर वायदंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी मेहनत घेतली. सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचेही आभार मानण्यात आले.