Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रिय सेवा योजनेंतर्गत व पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी
(दि. 30) आधार कार्ड व मतदान ओळखापत्राशी जोडण्याची कार्यशाळा आयोजित
करण्यात आली. कार्यशाळेत पनवेल महापालिकेचे अधिकारी डी. डी. निकम तसेच पनवेलचे नायब तहसीलदार संभाजी शेलार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना आधार कार्ड मतदार ओळखपत्राबरोबर कसे जोडावे ह्याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्राचे एक भारतीय नागरिक म्हणून असणारे महत्त्व समजावून सांगितले व उपस्थितांना प्रोत्साहन दिले व कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. प्रथमेश ठाकूर यांनी केले. तसेच डॉ. महादेव चव्हाण, प्रा. राजश्री म्हात्रे, प्रा. रामकृष्ण टोपे, प्रा. योगिता पाटील, प्रा. भाग्यश्री शुक्ला यांनी सहकार्य केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल प्रशंसा केली, तसेच आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

 

 

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply