पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम करते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये मध्ये नगरसेविका राजश्री वावेकर यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यकर्त्याच्या उद्घटनावेळी केले तसेचया नवीन कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सुटतील आणि जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा भाजप महिला मोर्चाच्या नवीन पनवेल अध्यक्षा राजश्री वावेकर यांनी प्रभाग क्रमांक 16 मध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालयाचे सुरु केले आहे. या कार्यलयाचे उदघाटन महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी अत्यंत उत्साहात संपन्न झाले.
यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उपमहापौर प्रमिला पाटील, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, संतोष शेट्टी, राजश्री वावेकर, अस्मिता घरत आणि माजी नगरसेविका संगीता कांडपाल, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, भाजप नेते महेंद्र वावेकर, अशोक भगत, जितेंद्र तिवारी यांसह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून देवेंद्र परब यांचा वाढदिवसही सर्व उपस्थितांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या जनसंपर्क कार्यालयामुळे प्रभागातील नागरिकांना आपल्या तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ अभंगांचे भव्य लोकार्पण
भक्ती, संगीत आणि संस्कृतीचा सुरेल संगम पनवेल ः रामप्रहर वृत्तथोर दानशूर व्यक्तिमत्व आणि माजी खासदार …
RamPrahar – The Panvel Daily Paper