पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष व युथ आयकॉन कृष्णराज महाडिक मंगळवार दि. 21 एप्रिल 2026 रोजी उत्तर रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. युवा शक्ती जागर यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांद्वारे युवकांशी संवाद साधण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
दौऱ्याची सुरुवात दुपारी 3.00 वाजता पनवेलमधील गार्डन हॉटेल येथून भव्य बाईक रॅलीद्वारे स्वागताने होणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येईल. दुपारी 4:00 वाजता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळसभागृहात युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संघटनात्मक बळकटीकरण व आगामी उपक्रमांवर चर्चा होणार आहे. सायंकाळी 5. 30 वाजता वडाळे तलाव येथे KM’ तरुणाई व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सोबत विशेष meet-up आयोजित करण्यात आला असून, डिजिटल माध्यमातून युवकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना युवक, युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Check Also
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …
RamPrahar – The Panvel Daily Paper