Breaking News

पनवेलमध्ये सायबर क्राईम माहिती कार्डचे प्रकाशन

भाजप शहर सरचिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे पनवेल शहर सरचिटणीस, जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 29) केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सायबर क्राईम माहिती कार्डचे प्रकाशन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, बबन मुकादम, हरेश केणी, समीर ठाकूर, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय समेळ, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, माजी नगरसेविका नीता माळी, तालुका सरचिटणीस लीना पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, भाजप युवा नेते उमेश इनामदार, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, कामगार नेते रवी नाईक, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, पत्रकार संजय कदम, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, पनवेल शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रसाद म्हात्रे, प्रभाग 18 अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अभिनव मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply