महाड : प्रतिनिधी
शिवप्रेमींना किल्ले रायगडावर केवळ चारच मिनिटांत घेऊन जाणार्या रायगड रोप वेची सेवा 5 ते 10 सप्टेंबर या काळात देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड रोप वेचे व्यवस्थापक सतीश माळवदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
किल्ले रायगडवर जाण्यासाठी रोप वेची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या कमजोर असणार्या व्यक्तींना गडावर जाणे येणे शक्य झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रोप वेची दर तीन-चार महिन्यांनी डागडुजी-दुरुस्ती करावी लागते. यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये रोप वेची सेवा देखभाल दुरुस्ती करण्यात आली होती. आता पुन्हा देखभाल व दुरुस्तीसाठी रायगड रोपवे 5 ते 10 सप्टेंबरदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान पर्यटकांच्या होणार्या गैरसोयीबद्दल मिलेनियम प्रॉपर्टीज प्रा. लि. कंपनीमार्फत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …