Breaking News

कामोठ्यातील पुरातन श्री गणेश मंदिर ट्रस्टचे सामाजिक कार्याला प्राधान्य

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे वसाहत वसण्याआधीपासून प्लॉट नं.5, सेक्टर 35 येथे पुरातन श्री गणेश मंदिर आहे. या मंदिराच्या ट्रस्टने गेले अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. येत्या 15 फेब्रुवारीच्या माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

या मंदिराचा सन 2009 साली जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि भव्य व आकर्षक मंदिर उभारण्यात आले. आज केवळ जुई-कामोठे ग्रामस्थच नव्हे तर वसाहतीतील रहिवाशांचे देखील आकर्षणाचे केंद्र बनले आहे. दररोज असंख्य गणेशभक्त आपल्या दिवसाची सुरुवात श्रींच्या दर्शनाने करत असतात. संकष्टी चतुर्थीला तर दर्शनासाठी भाविकांची रांग असते. माघी गणेश चतुर्थीला मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते यादिवशी परिसरातील हजारो भाविक दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतात.

पुरातन श्री गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष समाजसेवक प्रकाश पाटील, उपाध्यक्ष नगरसेवक दिलीप पाटील आणि सचिव नगरसेवक विजय चिपळेकर या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टने धार्मिकतेबरोबरच सामाजिकता देखील जोपासली आहे. ट्रस्टतर्फे निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांचे नेहमीच आयोजन केले जात असते.

रिद्धी सिद्धी अपार्टमेंट प्लॉट नंबर 6 सेक्टर 35 या इमारतीच्या संरक्षक भिंतीला बाहेरून प्लॅस्टर नव्हते. त्यामुळे त्या भिंतीचे सौंदर्य आणि आयुष्य वाढावे यासाठी ट्रस्टतर्फे स्वखर्चाने प्लॅस्टर आणि रंगरंगोटी करण्यात आली. ट्रस्टने सामाजिक जाणिवेतून केलेल्या या कार्या बद्दल तेथील रहिवाशांनी ट्रस्टचे आभार व्यक्त केले आहे.

येत्या 15 फेब्रुवारीला साजर्‍या करण्यात येणार्‍या माघी गणेशोत्सवाला गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष  दिलीप पाटील आणि सचिव  विजय चिपळेकर यांनी केले आहे. तसेच भविष्यात देखील पुरातन श्री गणेश मंदिर ट्रस्ट तर्फे निरनिराळे धार्मिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला.

सोयीसुविधा युक्त मंदिर परिसर

मंदिराला लागून असलेल्या आणि  आम्रवृक्षनी संपन्न असलेल्या मँगो गार्डन म्हणून परिचित उद्यानातील झाडांना संरक्षक कठडे ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आले आहेत. उद्यानात येणार्‍या आबालवृद्धांना बसण्यासाठी वृक्षांच्या भोवती चौथरे उभारण्यात आले आहे. बाकडे बसवण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना सोबत घेऊन येणार्‍या महिला वर्ग यांची बसण्याची सोय झाली आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply