Breaking News

पाइपलाइनच्या अपूर्ण कामामुळे महाड शहरात पाणीटंचाई

भाजपकडून टँकरने पाणीपुरवठा

महाड ः प्रतिनिधी

महाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोथुर्डे पाइपलाइनचे काम पूर्ण न झाल्याने महाड शहरात पाणीटंचाई निर्माण झाली.दरम्यान महिलांनी आक्रोश करीत नगरपालिकेवर मोर्चा काढला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भाजप महाडकरांसाठी धावून आले असून जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या माध्यमातून शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे महिलांनी भाजपचे आभार मानले.

महाड शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन महामार्गाच्या कामासाठी शिफ्टींग करण्याचे काम सुरू होते. यासाठी 28 व 29 सप्टेंबरदरम्यान महाडचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, मात्र हे काम पूर्ण न झाल्याने महाडमध्ये प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली. महिलांनी अखेर महाड नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला, मात्र महाड नगरपालिकेवर प्रशासक असल्याने लोकांची या समस्येची दखल घेणार कोण? अशा वेळी महाड शहर भाजप महाडकरांच्या मदतीला धावून आले.

भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, शहर अध्यक्ष निलेश तळवटकर, मनोज धामनसे यांनी तातडीने टँकरने पाणीपुरवठ्यास सुरुवात केली. भाजपाने केलेल्या या कार्याचे महाडमधून कौतुक होत आहे, मात्र पाइपलाइनचे काम करणारा ठेकेदार कुठे गेला? त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? असे अनेक प्रश्न आता महाडकर उपस्थित करीत आहेत, तर महाड नगरपालिका ही आता रामभरोसे आहे असेच एकंदर चित्र दिसत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply