पेण : रामप्रहर वृत्तपेणमधील म्हैसबाड (खारपाले) गावातील कुमारी श्वेता रवींद्र केणी हिने नुकत्याच झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करून महाराष्ट्र खेळ पुरस्कार पटकाविला. नवी मुंबई येथील पृथ्वी हॉलमध्ये इंडियन अॅलिम्पिक संघटनेचे व्हॉईस प्रेसिडेंट कुलदीप पँटस, दिल्ली अॅलिम्पिक असोसिएशनचे दीपक अग्रवाल, डायरेक्टर ऑफ इंडियन स्पोर्ट्स रिलेशनचे सुशील कुमार, राजकुमार बेदी, विशाल जाधव, जयेश चोगले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. श्वेताने आतापर्यंत भुतान येथे झालेल्या स्पर्धेत सिल्वरपदक, दिल्ली, सांगली, वडखळ येथे झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत विविध पुरस्कार मिळविले आहेत. श्वेताला योगेश सर, सोनू मॅडम, ठाकूर सर, जनता हायस्कूल गडब मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले. तिच्या यशाबद्दल म्हैसबाडचे ग्रामस्थ, मोजेपाले व पंचकोशीतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Check Also
खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …
RamPrahar – The Panvel Daily Paper