अलिबाग : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांची बेकायदेशीर मालमत्ते संदर्भात रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभीगाने (एसीबी) बुधवारी (दि. 12) चार तास चौकशी केली.
रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार साळवी यांना मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. 5 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ही चौकशी होणार होती, मात्र तेव्हा ते हजर राहू शकले नव्हते. त्यांनी हजर राहण्यासाठी वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ते बुधवारी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले. रायगड एसीबीच्या अलिबाग येथील कार्यालयात त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली.
एसीबीच्या अधिकार्यांनी माझ्या व माझ्या पत्नीच्या तसेच माझ्या दोन भावांच्या नावे असलेल्या मालमत्तेसंदर्भात माहिती विचारली. मी त्यांना सर्व महिती दिली. एसीबीने माला काही फॉर्म दिले आहेत. त्यात मालमत्तेची महिती भरून सदर करण्यात सांगितले आहे. महिती सादर करण्यासाठी 20 जानेवारी 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मी ही माहिती भरून दिलेल्या मुतदीत सादर करणार आहे, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper