Breaking News

पनवेलमधील बिकानेर स्वीट्स कॉर्नरचे उद्घाटन

पनवेल : शहरातील अस्पायर प्राईड बिल्डींगमध्ये बिकानेर स्वीट्स कॉर्नर (रूपाली चौक) या दुकानाचे नुतनीकरण झाले. त्याचे उद्घाटन मंगळवारी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री सत्यनारायण पुजा आयोजिण्यात आली होती. करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, गजानन पाटील, महेंद्र भोजे, नाथाभाई तसेच बिकानेर स्वीट्स कॉर्नरचे मालक भावेश सिरवी, महामंत्री देवारामजी, सिरवी समाज अध्यक्ष चेनारामजी, उपाध्यक्ष रमेशजी, सचिव पुनारामजी, बुधारामजी, विनोदजी, पुनमजी, सचिव अखिल भारतीय सिरवी समाज मंजू सिरवी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे शहर खजिनदार संजय जैन, भुराराम चौधरी, एकता चौधरी, नितीन चौधरी आदी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply