कर्जत : प्रतिनिधी
कर्जत चारफाटा येथील रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे मंगळवारी (दि. 7) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जमीनदोस्त करण्यात आली. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्जतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.
कर्जत-चौकदरम्यान चारफाटा येथे रस्त्याच्या कडेला टपर्या बांधून त्यावर व्यवसाय केला जायचा. त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत होती. याबाबत आवाज उठवत उपोषणही करण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्त घेऊन चारफाटा ते स्टेशनजवळील श्रद्धा हॉटेल या भागातील अतिक्रमणे कारवाई करून तोडली होती, तर मंगळवारी एमएसआरडीसीने रस्त्याच्या जागेत असलेली चारफाटा ते भिसेगाव येथील टी पॉइंट या एक किमी भागातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू केली. मागचा अनुभव पाहता स्थानिक व्यवसाय करणार्यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने कारवाई शांततेत झाली.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …