Breaking News

भाजप नेते विक्रांत पाटील यांच्या कार्यालयाजवळ शिवजन्मोत्सव

पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन विक्रांत पाटील शिवजन्मोत्सव प्रभागातील नागरिकांच्या सोबत मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यानुसार यावर्षी खास किल्ले रायगड वरून शिवज्योत आणण्यात आली होती, तसेच साक्षात माता आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देत असतानाचा चलचित्र देखावा उभारण्यात आला होता. पनवेल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवज्योत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले.
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून प्रभागातील माता भगिनींसाठी खास हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला प्रभागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराजांनी नेहमीच स्वराज्यातील माता भगिनींचे रक्षण तर केलेच पण त्याचबरोबर त्यांचा उचित सन्मानही राखला. परस्त्री ही माते समान, मग ती कोणत्याही धर्मातील असो हीच शिकवण महाराजांनी आपल्याला दिली आहे, असे मोहिनी विक्रांत पाटील यांनी या वेळी सांगितले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply