Breaking News

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे सोमवारी पनवेल येथे भूमिपूजन

मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अलिबाग : प्रतिनिधी
राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीचे भूमिपूजन येत्या सोमवारी (दि. 27) पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे सकाळी 11 वा. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे.
या भूमिपूजन समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी वि. उ. यादव यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात मुंबई येथील एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाकडून पनवेल आयटीआय येथील 10 एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय आणि आयटीआय यांचे एकत्रित बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply