Breaking News

पेण बाजार समितीवर भाजपप्रणित शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व

18पैकी 17 जागा जिंकून शेकापवर मात

पेण ः प्रतिनिधी
पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणित शेतकरी सहकार पॅनलने बाजी मारली. आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पॅनेलने 18 पैकी 17 जागा जिंकून शेकापवर एकतर्फी विजय संपादन केला.
सहकार पॅनलमधून संदेश शंकर ठाकूर, सुरेश पांडुरंग पाटील, हरिश्चंद्र वसंत पाटील, कृष्णा धाया म्हात्रेे, जयवंत यशवंत नारकर, महादू सटू मानकर, रामदास खेळ्या घासे, नितीन अंबाजी पाटील, शेवंती परशुराम ठाकूर, जयप्रभा प्रफुल्ल म्हात्रे, पूजा अशोक पाटील, महेश लक्ष्मण पाटील, सुधीर मारुती पाटील, जोमा राघो दरवडा, काशिनाथ जनार्दन पाटील, सुहास अनंत पाटील, सतिश चिंतामण पाटील या उमेदवारांनी विजय संपादन केला. त्यांची पेणमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी भाजपच्या कार्यालयात छोटेखानी सभा झाली. या सभेस आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, माजी जि. प. अध्यक्ष नीलिमा पाटील, माजी जि.प.सदस्य कौसल्या पाटील, रघुनाथ दळवी, भाजप जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, युवा नेते ललित पाटील, स्वप्नील म्हात्रे, सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अलिबागच्या नेत्यांना मतदारांनी जागा दाखवून दिली -आमदार रविशेठ पाटील

सभेत बोलताना आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले की, या निवडणुकीत माजी आमदार धैर्यशील पाटील व कार्यकर्त्यांनी अविरत कष्ट घेतले असून निवडणुकीतील प्रत्येक गोष्टीचा ते आढावा घेत होते. समोर सहकार क्षेत्रातील बलाढ्य नेते गेले 15 दिवस पेणमध्ये शड्डू ठोकून होते. या नेत्यांना मात देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले असून ही आगामी निवडणुकांच्या विजयाची नांदी आहे. अलिबागच्या नेत्यांनी पेणमध्ये येऊन मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या. त्या वल्गना हवेत विरून गेल्या असून मतदार व पेणकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. भाजपसारख्या मोठ्या पक्षाशी आपण जोडले गेले आहात याचा फायदा तळागाळातील नागरिकांची कामे करण्यासाठी व्हावा, असेही ते म्हणाले.

पक्षप्रवेशाचा निर्णय सार्थकी ठरला -भाजप नेते धैर्यशील पाटील
माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले की, पेण बाजार समितीची ही निवडणूक अलिबागच्या नेत्यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. सहकार खात्यातील जयंतभाई पाटील हे एक दिग्ग्ज नेते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शेकाप नेत्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती, पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे व येथे उपस्थित पदाधिकारी व मतदारांच्या आशीर्वादाने आपण या निवडणुकीत एकहाती सत्ता घेऊन कोकणात प्रथमच पेण कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे काम केले आहे. फेब्रुवारीमध्ये भाजपमध्ये जो प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आज मतदारांनी व कार्यकर्त्यांनी सार्थकी ठरवला आहे.

या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने हिरीरिने भाग घेऊन आपली कामगिरी चोख बजावली. यामुळे विरोधी आघाडीला धूळ चारण्यात आपण यशस्वी झालो आहोत. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन! पेण तालुक्यात भाजप वाढत असून सामान्य नागरिकांचे हित जपण्याचे काम पक्षाकडून होत आहे.
-मिलिंद पाटील, जिल्हा सरचिटणीस, भाजप

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply