Breaking News

करंजाडेचा पाणीप्रश्न लवकरच लागणार मार्गी

शहरास 1 जुलैपर्यंत नव्या जलवाहिनीतून पुरवठा

पनवेल : प्रतिनिधी

नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास 1 जुलै 2023 नंतरपाणीपुरवठा होईल अशी माहिती सोमवारी (दि. 15)  सिडको व एमजेपीच्या अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. या वेळी नवीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर सेक्टर 6 मधील पाण्याचे सर्व प्रश्न सुटतील व त्यानंतर परिस्थितीत बदल न झाल्यास स्वतंत्र जोडणी देण्याबाबत विचार करण्याचे मान्य करण्यात आले.  सद्यस्थितीत करंजाडेला 16 एमएलडी पाणीपुरवठा होत असून लवकरच करंजाडे पाणीप्रश्न निकाली निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास पाणीपुरवठा सुरू करणे बाबत सोमवारी  सिडको व एमजेपीच्या अधिकार्‍यांसह पूर्वनियोजित बैठक झाली. या वेळी सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एन.सी. चोथाणी,  गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी केबी पाटील व सिडको नोडल अधिकारी बनकर, भाजपचे शहर अध्यक्ष  मिरेंद्र शहारे, संतोष माजगावकर व प्रदीप हाडवले उपस्थित होते. या वेळी करंजाडे शहराच्या पाणीप्रश्नावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.  नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी अधिकार्‍यांनी वडघरसह अनेक गावे अद्याप जुन्या जलवाहिनीवर असुन त्यांच्या शिफ्टिंगची कामे सुरू आहेत. शिफ्टिंगचे काम एमजेपी, सिडको की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात यावे यावर चर्चा करून अखेर सिडकोच्या नोडल विभागाकडून शिफ्टिंगची कामे करण्याचे ठरले.  सदर कामे टेंडर काढून  करण्यात येणार असून त्या कामाची डेडलाईन एक ते दीड महिना असेल साधारणतः 1 जुलै 2023 पर्यंत कामे पूर्ण होतील व त्यानंतर नव्या जलवाहिनीतून करंजाडे शहरास पाणीपुरवठा होईल, अशी हमी देण्यात आली.

करंजाडेचे पाणी समोरच्या गावातील गावकरी येऊन बंद करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असता  त्यांच्या पाईपलाईनचे काम पुढच्या दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याने अशी परिस्थिती परत निर्माण होणार नसल्याचे सांगितले. करंजाडे सेक्टर-6 करिता शटडाऊन नंतर  अनेक दिवस होणारा त्रास कमी होण्यासाठी स्वतंत्र कनेक्शन देण्याची मागणी केली असता नवीन  जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यास सर्व प्रश्न सुटतील व त्यानंतर परिस्थितीत बदल न झाल्यास त्यावर विचार  करण्याचे  मान्य करण्यात आले. सिडकोकडून करंजाडे, वडघर आर 1,2,3,4 याकरिता 35 एमएलडीची एमजेपीकडे मागणी करण्यात आली असुन नवी जलवाहिनी सुरू झाल्यास पुर्णतः पाणीप्रश्न निकाली निघेल असे सांगण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply