Breaking News

कामोठ्यात साकारतोय कुस्तीचा आखाडा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल क्षेत्रातील कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी असून महापालिकेमार्फत कामोठ्यामध्ये कुस्तीचा आखाडा तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी जाऊन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 30) महापालिकेच्या अधिकार्‍यांसह पाहणी केली.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील खेळाडूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्या अंतर्गत कामोठे सेक्टर 8 प्लॉट 25 ए येथे महापालिकेमार्फत कुस्तीचा आखाडा तयार येणार आहे.
पाहणी वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भाजप नेते प्रदीप भगत, संतोष म्हात्रे, युवा नेते हॅप्पी सिंग, महापालिकेचे अधिकारी राजेश करडिले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply