Breaking News

कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही -‘डब्ल्यूएचओ’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अनेक देशांमध्ये कोरोना लशींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी लशी तिसर्‍या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम पाहिले तर कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूनो) महासभेत त्यांनी हे वक्तव्य केले.
घेब्रेयेसस पुढे म्हणाले की, कोरोना काळात जगाने माणसाची चांगली रूपे पाहिली आहेत तशीच वाईटही रूपे पाहिली. कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच संक्रमणही पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे काळजी घ्यावीच लागणार आहे. कोरोनावरची लस जेव्हा येईल त्यानंतर संपूर्ण जगाला गरिबी, उपासमारी, असमानता यांच्याशी लढावे लागणार आहे.
श्रीमंत आणि प्रगत देशांनी गरीब देशांना मदत करावी. लशीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply