कामोठ्यात इन्व्हेस्टीचर समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकर पब्लिक स्कूलचा इन्व्हेस्टीचर समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 10) उत्साहात झाला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व समजावून सांगत यशस्वी नेतृत्वगुणाचा कानमंत्र दिला.
या कार्यक्रमाला महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, आर. पी. ठाकूर, सहाय्यक निरीक्षक शहाजी फडतरे, शालेय समिती सभासद आशा भगत, खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, नवीन पनवेलच्या सीकेटी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, कॉर्डिनेटर सोनाली पवार, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कठोर मेहनत आणि शिस्तीच्या जोरावरच समाजाचे नेतृत्व घडते, असे अधोरेखित केले.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला, तर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मान्यवरांची मने जिंकली.