Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कलाकारांना धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपतर्फे अरविंदो मीरा संस्थेच्या नयन पवार यांनी कलाकारांना धान्यवाटप केले. सध्या कोरोनामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने बॅक स्टेज कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानुसार बॅक स्टेज कलाकारांना धान्याचे वाटप करण्यात आले. दादर टीटी (मुंबई) या ठिकाणी हा वाटपाचा कार्यक्रम झाला. याआधी त्यांनी वडाळा येथील पाच उद्यान या ठिकाणी अनेक कलाकारांना धान्याचे वाटप केले होते. त्यानंतर दादरमध्ये राहणार्‍या कलाकारांनी ही मदत मागितली. त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दादरच्या कलाकारांना धान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर खानविलकर आदी उपस्थित होते.

Check Also

संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Leave a Reply