पनवेल ः रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची योग्य निवड करणे गरजेचे असल्याचा बहुमोल सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठ्यात आयोजित दहावी, बारावी उत्तीर्ण सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन शिबिरात दिला तसेच हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजपचे कामोठे मंडळ सरचिटणीस आणि ओम सिटी फाऊंडेशनचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 14) करण्यात आले होते. याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत विद्यार्थ्यांचा सत्कार केला, तर या वेळी आंतरराष्ट्रीय करिअर सल्लागार सुनीलकुमार पांडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आयटीएम इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर संकल्प राव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे मंडळ चिटणीस दामोदर चव्हाण, विनोद खेडेकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोहर शिंगाडे, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, सुरेखा लांडे, वर्षा शेलार, सागर ठाकरे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र बोबडे, गोरखनाथ पोळ, नाभिक समाज अध्यक्ष संतोष भोसले, रश्मी भारद्वाज, फातिमा आलम, प्रवीण कोरडे, विकी टेकवडे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …